ओप्पोनं आपल्या बजेट A सीरीजमध्ये नवी भर घातली आहे. सोमवारी भारतात लॉंच झालेला ओप्पो A6c हा मोबाइल बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक वैशिष्ट्यांसह बाजारात आला आहे. मोठ्या बॅटरी, चांगल्या डिस्प्ले आणि किफायतशीर किंमतीमुळं हा फोन विद्यार्थी आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन सध्या उपलब्ध आहे.
ओप्पो A6c किंमत आणि उपलब्धता :ओप्पो A6c ची किंमत भारतात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 13,999 आहे. तर 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 आहे. दोन्ही व्हेरिएंट Feather White आणि Stone Brown या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. फोन सध्या फक्त ओप्पो इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. भविष्यात इतर ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्समध्येही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या किंमतीत 7000mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले यात मिळतोय.
ओप्पो A6c वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स :ओप्पो A6c मध्ये 6.75 इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिझोल्यूशन 720 x 1570 पिक्सेल आहे. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 86% DCI-P3 कलर गॅमट आणि 900निट्स पीक ब्राइटनेससह येतो. 90.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि 256ppi पिक्सेल डेन्सिटीमुळं डिस्प्ले वापरकर्त्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. फोनला IP64 रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळं धूळ आणि पाण्याच्या हलक्या स्प्लॅशपासून संरक्षण मिळतं.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: फोन Unisoc T7250 ऑक्टा-कोर चिपसेटवर चालतो. Mali-G57 GPU सोबत 4 जीबी LPDDR4x रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. दैनंदिन कामे, सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि हलकी गेमिंगसाठी हा फोन पुरेसा आहे. सिक्युरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप: मागील बाजूला 13 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा (f/2.2, ऑटोफोकस) आणि दुसरा सेन्सर आहे. समोर 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. फोन 1080p 30fps व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतो. बजेट सेगमेंटमध्ये अपेक्षित असलेल्या फोटो आणि व्हिडिओ क्वालिटी या फोनकडून मिळेल.
बॅटरी आणि चार्जिंग:ओप्पो A6c ची सर्वात मोठी खासियत म्हणजे 7000mAh ची मोठी बॅटरी.या फोनमुळं एका चार्जवर दीर्घकाळ वापर शक्य होईल.15W वायर्ड चार्जिंगसपोर्ट यात आहे. USB Type-C पोर्टद्वारे चार्जिंग करता येईल.
कनेक्टिव्हिटी आणि इतर:फोन ड्युअल सिम सपोर्ट करतो.यात 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.2, 3.5mm हेडफोन जॅक, GPS, GLONASS इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
ओप्पो A6c बजेट सेगमेंटमध्ये मोठ्या बॅटरी आणि चांगल्या डिस्प्लेसह आला आहे. दैनंदिन वापरासाठी हा फोन योग्य पर्याय ठरू शकतो. किंमत आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत त्याची स्पर्धा Redmi, Realme आणि Samsung च्या बजेट मॉडेल्सशी होईल. अधिक माहितीसाठी ओप्पोच्या अधिकृत साइटला भेट द्या.






