Friday, June 5, 2026
Homeकोल्हापूररांगोळीत किरकोळ कारणावरून एकास मारहाण सहाजणांवर गुन्हा दाखल

रांगोळीत किरकोळ कारणावरून एकास मारहाण सहाजणांवर गुन्हा दाखल

  • रस्त्यात लावलेली दुचाकी बाजूस घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण करण्यासह सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी सहाजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहसीन जमाल मुल्लाणी (वय ३७ रा. मुल्लाणीवाडी रांगोळी) याने फिर्याद दिली आहे.

 

बुधवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी मोहसीन मुल्लाणी हे चारचाकी बाहनातून घरी जात होते. त्यावेळी त्यांनी अब्दुल मुलाणी याने रस्त्याच्या मधोमध लावलेली दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने अब्दुल हा मोहसीन वाच्या अंगावर धावून गेला, तर दिलदार, मोहद्दीन, सद्दाम, यासीन, व अफताब मुललाणी यांनी मोहसीन बाला धक्काबुक्की व शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मोहसीन याच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अब्दुल गौस मुल्लाणी, दिलदार गौस मुल्लाणी, मोहद्दीन उस्मान मुल्लाणी, सदाम इब्राहीम मुल्लाणी, यासीन सलीम मुल्लाणी व अफताब मोहद्दीन मुल्लाणी (सर्व रा. मुल्लाणीवाडी रांगोळी) या सहाजणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -