Homeइचलकरंजीनांदणीच्या माधुरी हत्तीणप्रकरणी मंगळवारी सुनावणी

नांदणीच्या माधुरी हत्तीणप्रकरणी मंगळवारी सुनावणी

नांदणी (ता. शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाकडे माधुरी हत्तीण परत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हत्तीण परत आणण्यासाठी कागदपत्राची पूर्तता केली आहे.

 

त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 23) उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष दीपक शर्मा यांनी ऑनलाईन सुनावणी बोलावली आहे. त्यामुळे सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

माधुरी हत्तीण परत मिळण्यासाठी नांदणी मठ, वनतारा व राज्य शासनाच्या वतीने उच्च समितीकडे यापूर्वी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. समितीने यापूर्वीदेखील सुनावणी घेतली होती. दरम्यान, माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी प्रशासकीय व स्थानिक पातळीवर वेग आला आहे. माधुरीच्या निवासाची सोय व सुविधा तपासण्यासाठी वनताराच्या पथकाने नांदणी येथे नुकतीच पाहणी केली आहे. या ठिकाणी सर्व सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च समितीचे अध्यक्ष दीपक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली २३ जूनला सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. नांदणी येथे माधुरी हत्तिणीसाठी रंगरगोटी करण्यात आली आहे. यात गारव्यासाठी शॉवर आणि कुलर बसविण्यात आला आहे. सुरक्षितेसाठी दोन्ही बाजूला जाळी मारण्यात आली आहे. उंच भागावर दगडाचे पिचिंग काम सुरू आहे. आगामी दोन दिवसांत सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

 

डिजिटल फलक आणि सोशल मीडियावर धूम

 

‘माधुरी परत येत आहे… तुझ्या आगमनाची ओढ लागली आहे’ अशा आशयाचे फलक नांदणी येथे झळकली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर सर्व माधुरी हत्तिणीच्या फोटो आणि व्हिडीओची धूम आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यासह राज्यभरातील नागरिकांचे माधुरी हत्तीण कधी परत येणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -