Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मतमोजणीला सुरूवात, १० वाजता चित्र स्पष्ट होणार...

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मतमोजणीला सुरूवात, १० वाजता चित्र स्पष्ट होणार ( लाईव्ह अपडेट्स मतमोजणीला सुरुवात )

ताजी बातमी ऑनलाईन टीम


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवार सकाळी (दि.०७) ८ वाजल्यापासून सुरूवात झाली. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी होत आहे. दरम्यान, जिल्हा बँकेचा पहिल्या टप्प्यातील कौल सकाळी दहा वाजता समजणार आहे. बँकेच्या निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

महिनाभर जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणार्‍या जिल्हा बँक संचालकांच्या २१ जागांपैकी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी आ. अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची निवड बिनविरोध झाली. संस्था गटातील सहा जागांसह १५ जागांसाठी ३३ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी झालेल्या मतदानानंतर मतपेटीत बंद झाले.

जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात १०० टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात ४४८ पैकी ४४६, पतसंस्था गटात १२२१ पैकी १२०७, इतर संस्था गटात ४११५ पैकी ३९९५ असे सरासरी ९८ टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्कंठा सर्वच घटकांना लागून राहिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -