भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा अलर्ट जारी केला. रेड अलर्टसोबतच ऑरेंजही अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे येथे पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला. अनेक भागात अतिमुसळधार पावसाला सुरूवात झाली. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अनेक नद्यांची पातळी वाढली आहे. 4 ते 6 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कायम असणार आहे. त्यातच आज अतिमुस र पावसाचा इशारा देण्यात आला. विक्री पाऊस होण्याचा अंदाज आहे. यादरम्यानच सीएमओ कार्यालयाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले. 4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916, पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873, ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827 ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101 पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42
जर या पावसादरम्यान कोणी कुठे अडकले तर तात्काळ या संपर्क क्रमांकावर नागरिकांनी कॉल करावा. प्रशासनाकडून तुम्हाला तात्काल मदत पोहोचवली जाईल. काही सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. प्रशासनाचे या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. पुढील काही दिवस हाहाकार माजवणारे आहेत. याच पार्श्वभूमीवर मुलांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.





