भारतीय रिजर्व बँकेने आपल्या ऑगस्ट 2026 च्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीत देशाची अर्थव्यवस्था, GDP आणि महागाई संदर्भात नवे आकडे जारी केले आहे. सोमवार 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या बैठकीत RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की समितीने रेपो दर 5.25% इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासोबतच RBI ने स्पष्ट सांगितले की या वर्षी महागाई दर हा अपेक्षित दरापेक्षा जास्त राहणार आहे. महागाई वाढणार असली तरी आनंदाची बातमी म्हणजे देशाची GDP मध्ये याच काळात वाढ दिसून येणार आहे.
या वर्षात महागाई कशी असेल?
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाईचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहिला. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे.
त्यांच्या मते, आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महागाई उच्चांक गाठू शकते. त्यानंतर महागाईचा वेग कमी होण्याची अपेक्षा आहे. पुरवठा साखळीवरील अडचणी अद्याप कायम असून, त्यामुळे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा मंदावण्याचे संकेतही त्यांनी दिले.
तिमाही आधारावर महागाई दर
पहिली तिमाही – जून 2026 – 4.1%
दुसरी तिमाही – सप्टेंबर 2026- 4.7% आधी 5.1% अनुमान होता)
तिसरी तिमाही- डिसेंबर 2026 – 5.9% (या वर्षातील सर्वाधिक महागी दर असेल)
चौथी तिमाही- मार्च 2027 – 5.5% (तिसऱ्या तिमाहीनंतर कमी होईल)
आर्थिक वर्ष 2027-18 – पहिली तिमाही -जून 2027- 5.3% असेल
याचाच अर्थ FY27 मध्ये सरासरी महागाई दर हा 5.0% च्या वर असणार आहे म्हणजेच RBI च्या अनुमानानुसार या पूर्ण वित्तीय वर्षात महागाई दर 4% पेक्षा वर राहणार आहे. तसेच कोअर महागाई दर 4.3% असणार असल्याचा अनुमान आहे.
दिवाळीत महागाई वाढणार
या आर्थिक वर्षाची तिसरी तिमाही ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत असेल. यात नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे RBI नुसार या काळात महागाई दर 5.9 टक्क्यांवर जाण्याची शक्यता व्यक्त केल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.
16 महिन्यांनी महागाई 4 टक्यांच्या वर
जून महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर म्हणजेच CPI आधारित महागाईचा दर वाढून 4.4 टक्क्यांवर पोहोचला. यापूर्वी सलग 16 महिने हा दर RBI ने निश्चित केलेल्या 4 टक्के लक्ष्याच्या आसपास किंवा त्याखाली होता.
अन्नधान्य आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे महागाईत ही वाढ झाली आहे. मात्र, कोअर महागाई अद्याप स्थिर असल्याने अर्थव्यवस्थेवरील एकूण महागाईचा दबाव मर्यादित असल्याचे RBI ने स्पष्ट केले. तसेच, CPI महागाईचा दरही RBI च्या अंदाजानुसारच राहिल्याचे सांगण्यात आले.


