Homeमहाराष्ट्रसरकारचा मोठा निर्णय, एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू, आता वर्दीत Video कराल...

सरकारचा मोठा निर्णय, एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू, आता वर्दीत Video कराल तर…

राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्याने वर्तन आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार एसटीची प्रतिमा मलिन करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई करण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.

 

जे कर्मचारी नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. एसटीचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना काय करता येणार नाही?

 

 

एसटी महामंडळातील चालक, वाहक आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवे सोशल मीडिया नियम लागू असतील. कर्तव्यावर असताना रील्स, व्हिडिओ बनवण्यास एसटी महामंडळाने कडक बंदी आणली आहे. तसेच वाहन चालवताना रील्स, शॉर्ट्स, लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास सक्त मनाई असणार आहे. आगार, बसस्थानक, कार्यालय आणि एसटी बसमध्ये गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी असणार आहे.

 

महामंडळाची गोपनीय माहिती, फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करायचे नाही

 

 

एसटी महामंडळाची गोपनीय माहिती, फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. सकारात्मक व्हिडिओंसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी बंधनकारक असणार आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

 

 

नियमांचे उल्लंघन केल्यास कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येईल तसेच शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे प्रवासी सुविधा, स्वच्छता आणि रस्ता सुरक्षा प्रचारासाठी इन्फ्लुएन्सर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल.

 

राज्य परिवहन महामंडळातील समाज माध्यमांवर सक्रीय असणारे कर्मचारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून महामंडळाच्या अधिकृत माहितीचा, विविध प्रवासी सुविधा, लोककल्याणकारी योजना, अभिनव उपक्रम स्वच्छता व रस्ते सुरक्षा अभियान यांचा प्रसार करणे करीता महामंडळातील इन्फ्यून्सर यांचा उपरोक्त अटी-शर्तीच्या आधारे प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. यासाठी आवश्यकतेनुसार विभाग स्तरावर संवाद बैठक आयोजित करून त्यांना महामंडळाच्या विविध योजना, उपक्रम व जनहिताच्या मोहिमांची माहिती वेळोवेही उपलब्ध करून द्यावी.

 

जे समाज माध्यमांवर सक्रीय, त्यांची माहिती जनसंपर्क शाखेला द्या

 

 

राज्य परिवहन महामंडळातील समाज माध्यमांवर सक्रीय असणारे कर्मचारी-अधिकारी यांची माहिती जनसंपर्क शाखा, रा.प. मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांना उपलब्ध करून देण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -