Saturday, April 20, 2024
Homeअध्यात्मका बांधावा काळा धागा? काय आहेत याचे नियम व फायदे?

का बांधावा काळा धागा? काय आहेत याचे नियम व फायदे?

मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, काही लोकं त्यांच्या पायाला आणि हाताला काळा धागा बांधतात. काही लोकांना असे वाटते की फॅशन म्हणून काळा धागा बांधला जातो. मात्र काळा धागा ही फॅशन नसून तो दृष्ट नजरेपासून बचावासाठी  पायाला बांधलो जाते. याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात. जाणकार सांगतात की, काळा धागा धारण केल्याने पत्रिकेतील शनी बलवान होतो आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते. मात्र यासाठी काही नियमही पाळणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो जाणकारांच्या मते ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल, त्या हातात दुसरा रंगाचा धागा बांधू नये. जेव्हा तुम्ही काळा धागा बांधाल तेव्हा त्यात 9 गाठी बांधा. तसेच काळा धागा बांधताना शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी. यासाठी तुम्हाला ज्योतिषाशी संपर्क साधावा लागेल. काळा धागा वाईट नजरेपासून रक्षण करतो आणि जीवनातील समस्या दूर करतो.

घरातील कोणताही सदस्य किंवा मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याचा आजार औषधाने बरा होत नसेल तर त्याच्या कंबरेला काळा दोरा बांधावा. यामुळे मुलाचे आजार बरे होतील आणि उपचाराचा लाभ लवकरच मिळेल.

शास्त्राचे जाणकार सांगतात की, काळा धागा घाला बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा. घराच्या दारावर काळ्या धाग्यात लिंबू आणि मिरची लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारीत.

तसेच जर तुमच्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायावर काळा धागा बांधा, असे केल्याने बाळ कमी आजारी पडेल.पत्रिकेतील कोणत्याही ग्रहांचा प्रभाव कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने शनीची महादशा, साडेसाती आणि अडिचकीचा प्रभाव कमी होतो.

यासोबतच पत्रिकेत शनि ग्रहाला बळ मिळते. पत्रिकेत राहु-केतू कमजोर असेल तर ज्योतिषी पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला देतात. तर तुम्ही देखील वरील नियमांचे काटेकोरपणे पालन करून काळा धागा अवश्य बांधा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -