Homeइचलकरंजीनदीवेस परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिकांमध्ये संताप

नदीवेस परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिकांमध्ये संताप

नदीवेस चावरे गलनी परिसरात महानगरपालिकेकडून नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी अत्यंत काळेकुट्ट व दूषित अमात्याने नागरिकांमध्ये तीख संताप व्यक्त होत आहे.

 

पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधे महानगरपालीका प्रशासनाचा हा निष्काळजीपणा गंभीर आहे. नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने तातडीने वा पाणीपुरवठ्याची तपासणी करून पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासावा दूषित पाणी देण्याचे नेमके कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

 

तसेच संबंधित परिसरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर महानगरपालिका प्रशासनविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -