राज्यात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, साखरेच्या होलसेल दराने गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार रुपयाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.
साखरेच्या दराने मोठी उच्चांकी गाठली असून, साखरेचे आजचे ठोक दर हे 7 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे.
काल (19 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारात होलसेल साखरेचे दर बघितले तर क्विंटल मागे 6 हजार 500 रुपयांवर पोहोचले होते. याच दरात आता मोठी वाढ झाली आहे.
तेच तर आज 7हजार 500रुपयांवर गेले आहेत. साखरेचे हे आत्तापर्यंतचे इतिहासातील सर्वात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आता ही भाववाढ झाल्याने सामान्यांच्या घरातील बजेट कोलमडणार आहे.
दरम्यान, आता साखरेचा भाव वाढल्याने सरकारने लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा आणि साखरेचा दर पुन्हा एकदा सामान्यपातळीवर येण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे


