कबनूर गोळीचार प्रकरणातील जॉकी माळगे पाला पिस्तूल पुरविणाऱ्या पसार संशयित अभिषेक ऊर्फ मनीष आनंद हावळे (वय २५, रा. आष्टा, जि. सांगली) चाला शिवाजीनगर पोलिसांनी अखेर अटक केली. अटकेनंतर त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कबनूरातील गोळीबार प्रकरणाच्या तपासात जॉकी माळगे वाच्याकडे असलेले पिस्तूल अभिषेक ऊर्फ मनीष हाथ याच्याकडून मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर हाथळे हा पसार असल्याने शिवाजीनगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.


