शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस पुन्हा वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर चनला आहे. दरम्यान, मोकाट कुत्यांना पकडणे व नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम संबंधित मक्तेदाराला बिल मिळाले नसल्याने काम यांववाले असल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात आहे. महानगरपालिकेच्या अशा कारभारामुळे नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचे टोळके बादत असून काही ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे हल्लेही बाढत चालले आहेत, त्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेच्या वतीने भटक्या कुष्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदीची मोहीम हाती घेतली होती. मात्र मक्तेदाराला बिले अदा केले नसल्याने नसबंदीचे मोहीम बंद केल्याचे समजते.
महापालिकेकडून विविध कामांची लाखो रुपयांची बिले नियमितपणे काढली जात असतील, तर नागरिकांच्या बेट जीविताशी संबंधित असलेल्या मोकाट कुज्यांच्या नियंत्रणाच्या कामाला प्राधान्य का दिले जात नाही?
प्रशासनाच्या प्राधान्यक्रमात नागरिकांची सुरक्षितता शहरातील विविध लहान मोठ्या गल्ल्यांमध्ये रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांचे टोळके आढळून येतात. एखादे वाहन जात असताना त्यावर हल्ले करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सर्वांत वरची असणे अपेक्षित आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने तातडीने मोकाट कुत्र्यांचे पकडणे, नसबंदी शस्त्रक्रिया मोहिम तातडीने सुरू कराची अशी मागणी भाजपाचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केले आहे.


