Homeइचलकरंजीतारदाळमध्ये रात्रीत तीन ठिकाणी चोरी चोरट्यांनी सीसीटीव्हीची दिशा बदलली

तारदाळमध्ये रात्रीत तीन ठिकाणी चोरी चोरट्यांनी सीसीटीव्हीची दिशा बदलली

गौरीशंकर नगर ते तारदाळ रोडवरील मैत्री हॉटन परिसरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उहाली आहे. चोरट्यांनी मोठ्या शिताफीने चोरी करत हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण शाले आहे

 

मैत्री हॉटलच्या साईटच्या कंपाउंडचा पत्रा उचकून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तेथून तीन गैस

 

टाक्या, जेवणाची भांडी तसेच अन्य साहित्य असा अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

 

याच परिसरातील सचिन अणकर यांच्या सुरु असलेल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी उभारलेल्या पत्र्याच्या निवाराशेडमधून सेंटिंग कामगारांचे तीन कटर मशीन व एक बेल्डिंग मशीन चोरट्यांनी लंपास केले. तसेच लोटस पार्क कमानीजवळील विनायक कोरे यांच्या वडापावच्या गाड्यातून गॅसची टाकी, भांडी व खाद्यपदार्थाचे साहित्य बोरीला गेले. विशेष म्हणजे मैत्री हटिल तसेच अणक यांच्या बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलो आहेत.

मात्र, चोरट्यांनी कॅमे-यांची दिशा काच्या बाजूला वळविल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. त्यामुळे चोरट्यांना परिसराची माहिती असण्याची शक्यता व्यक्त होत असून चोरी पूर्वनियोजित असावी असा संशय आहे. एकाच रस्त्यावर तीन ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तारदाळ परिसरात चोरीच्या घटनांमध्ये बाड होत असल्याने शहापूर पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढ चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -