काजुवाडी-वैतीनगर मित्र मंडळाचा ‘मीनाक्षी मंदिर’ देखावा ठरणार आकर्षण
काजुवाडी-वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा ४९ वा श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ‘मीनाक्षी मंदिर, मदुराईचा प्राचीन द्रविड चमत्कार’ हा भव्य देखावा असणार आहे. तमिळनाडूतील मदुराई येथील ऐतिहासिक मीनाक्षी मंदिराची भव्यता, प्राचीन द्रविड स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वारसा या देखाव्यातून साकारण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या गणेशोत्सवाची परंपरा आजही उत्साहाने सुरू आहे. ‘काजूवाडीचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यातील सागर खेडकर यांनी गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली अनोखी गणेश विसर्जनाची परंपरा यंदाही जपली.
पाण्याच्या तळाशी जाऊन सागर खेडकर यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे भावनिक विसर्जन केले. बाप्पाला निरोप देताना सागर खेडकर यांनी भक्ती आणि भावनेचा अनोखा अनुभव यावेळी व्यक्त केला. शाडू मातीची मूर्ती आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यात आले. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सागर खेडकर यांनी गणरायाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला. विशेष म्हणजे, या अनोख्या गणेश विसर्जनाचे अंडरवॉटर व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले.
