Homeमहाराष्ट्र१ नोव्हेंबरपासून गॅस बुकिंगच्या नियमांत मोठा बदल! हे काम न केल्यास सेवा...

१ नोव्हेंबरपासून गॅस बुकिंगच्या नियमांत मोठा बदल! हे काम न केल्यास सेवा बंद होईल

ज्यांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी त्वरित आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून सबसिडी आणि नवीन नियमांची माहिती घेणे गरजेचे आहे.

 

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच स्वयंपाकाच्या गॅस ग्राहकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः एलपीजी (LPG) आणि पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) वापरणाऱ्यांनी गॅसचे दर, आधार व्हेरिफिकेशन, सिलिंडर बुकिंग आणि डिलिव्हरीच्या नियमांबाबत अपडेट राहायला हवं. १ नोव्हेंबरपासून सगळेच नियम बदलणार आहेत असं नाही, पण काही नियम आधीच लागू झालेत. तर दुसरीकडे, महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅसच्या दरांचा आढावा घेतला जाऊ शकतो.

 

तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरांचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर आणि पुरवठ्याच्या स्थितीनुसार हे दर कमी-जास्त होऊ शकतात. याचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चावर होतो.

 

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांचाही आढावा घेतला जाऊ शकतो. पण घरगुती गॅसचे दर दर महिन्याला बदलत नाहीत. नवीन दर लागू होणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या घोषणेकडे लक्ष ठेवावं लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -