इचलकरंजी शहर आणि परिसरातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी इचलकरंजी शहरासाठी स्वतंत्र अवधान्य वितरण कार्यालय स्थापन करण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. आम. राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लाखो रेशनकार्डधारकांना शासकीय कामकाजासाठी होणारा त्रास थांबून मोठा दिलासा मिळणार आहे.
अब, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. आम. राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सर्व निर्णय मार्गी लागले असून, त्यामुळे
इवलकरंजी शहरासह परिसरातील रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर धान्य मिळावे, रेशन दुकानांवरील नियंत्रण सक्षम व्हावे यासाठी इचलकरंजीत स्वतंत्र कार्यालयाची मागणी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होती. आमदार आवाडे यांनी शासन दरबारी या विषयाचा गांभीयनि पाठपुरावा केला. त्यानुसार स्वतंत्र अजधान्य वितरण कार्यालय सुरु करण्यासह प्रत्यक्ष कार्यालय कार्यरत होईपर्यंत प्रशासकीय कामात खंड पडू नये म्हणून इचलकरंजीसाठी पूर्णवेळ पुरवठा निरिक्षण अधिकारी नियुक्त करण्याचे बेट निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयानुसार इचलकरंजीतील अपर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीतील कबनूर, चंदूर, कोरोची, तारदाळ व खोतवाडी या पाच प्रमुख गावांचे पुरवठा कामकाज प्रस्तावित निरिक्षण अधिकारी यांच्याकडे वर्ग
इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र असून येथे कामगार आणि मध्यमवर्गीय लोकसंख्या मोठी आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत विनाअडधा पोहोचवण्यासाठी स्वतंत्र कार्यालय अत्यंत आवश्यक होते. या निर्णयामुळे शहर व परिसरातील ग्रामीण जनतेला शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. अशी प्रतिक्रिया आम. राहुल आवाडे यांनी दिली.
करण्यात आले आहे. त्यामुळे पाचही गावांतील सर्वच रास्तभाव धान्य दुकाने आणि शिधापत्रिकांसंबंधीचे सर्व कामकाज आता स्थानिक पातळीवरच निकाली निघणार आहे.
स्वतंत्र कार्यालय सुरू होताच रेशम दुकानांची नियमित तपासणी, गैरप्रकारांना आळा घालणे आणि लाभार्थ्यांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यासाठी विविध सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे धान्याचे योग्य वाटप आणि लाभार्थ्यांच्या अडचणी घेट सोडवण्यास गती मिळेल.

