येथील बंगला रोडवर दिवाळीचा बाजार भरविण्यासाठी जागा निश्चितीवरुन व्यापा-यांच्यात जोरदार वादावादी व हाणामारीचा प्रकार घडला.
यावेळी अतिक्रमण निर्मुलन पथकाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद शमला. मात्र, बाजार भरण्यास अद्याप आठवड्याचा कालावधी असताना आतापासूनच जागा आरक्षित करुन त्याठिकाणी मंडप उभारले जात आहेत.
इचलकरंजीत मागील पाच दशकापेक्षा अधिक काळ दिवाळी सणाच्या काळात श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर बाजार भरविला जात होता. त्यामुळे हा रस्ता तीन ते पाच दिवस वाहतूकीसाठी पूर्णतः बंद केला जात होता. मागील दोन वर्षापूर्वी याच मुख्य रस्त्यावर घडलेली दुर्घटना आणि काही व्यापाऱ्यांची न्यायालयात दाखल केलेली याचिका यामुळे मागील वर्षापासून मुख्य रस्त्यावर बाजार भरविण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे महानगरपालिका
व पोलिस प्रशासनाच्या वतीने छोठ्या स्थानिक व्यापाऱ्यांसाठी श्री शंभुतीर्थ ते प्रांत कार्यालय चौक या बंगला रोडवर जागा निश्चित करुन दिली आहे. शुक्रवारी सकाळी या रोडवर जागा निश्चितीसाठी व्यापारी मोठ्या संख्येने जमले होते. त्यातच राजाराम
मैदान समोरील जागेवरुन काही व्यापाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मात्र, महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा वाद मिटविला.

