इचलकरंजी महापालिकेच्या मालकीच्या शहिद भगतसिंग उद्यानामध्ये इलेक्ट्रिकल मॅकॅन्ड्रिाम एम्युझमेंट इशेन ची. ओ.टी. तत्वावर खाजगी मक्तेदाराला देण्याचा ठराव ३० एप्रिल रोजीच्या महापालिका सभेत होऊन मुद्धा त्याची कार्यवाही अद्याप न झाल्याने नागरीकांची विशेषतः बालचमुंची हेळसांड होत होती.
त्यामुळे उद्यानातील रेल्वे, बोटींग, कारंजे, धबधबे, बंद पडलेली खेळणी आणि मासेपेटी पुन्हा नागरीकांच्या सेवेत याचीत याकरीता नगरसेविका सौ. जुलेखा जहांगिर पटेकरी बांनी स्वखर्चातून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत या बाबींचा नागरीकांसह बालचमुंना आनंद लुटता येणार आहे.
महानगरपालिकेच्या शहिद भगतसिंग उद्यानातील अनेक खेळण्याची दुरावस्था झाली होती. बीओटी तत्वावर देण्याचा ठराव
देखील केला आहे. मात्र, महापालिकेतील गलथान कारभाराचा फटका त्याला बसल्याने अद्याप सदर मक्तेदाराने हे काम सुरु केले नाही. आठ दिवसांवर दिवाळी मोठा सण आहे. त्यानंतर मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागतात. या मुट्ट्यांमध्ये बालचमुंना आनंद घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्यामुळे पट्टेकरी दांम्पत्याने प्रशासनाशी संपर्क साधून या सर्व बाबी स्वखर्चातून नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला. त्याला प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही कामे पुर्णत्वास आली आहेत. २०१६-१७ मध्ये देखील पालिकेच्या माध्यमातून पटेकरी दांम्पत्याने या उद्यानातील बरिचशी विकास कामे केली होती.
प्रसंगी स्वखर्चातून अनेक बाबी त्यांनी पुर्ण केल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्यानातील रेल्वे, बोटींग, कारंजे, धवधचे, बंद पडलेली खेळणी पुन्हा नव्या रुपात आल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

