Homeक्रीडापाच दिवस शिल्लक राहिले, १० खेळाडू या संघातून त्या संघात गेले!हार्दिक पांड्याने...

पाच दिवस शिल्लक राहिले, १० खेळाडू या संघातून त्या संघात गेले!हार्दिक पांड्याने केला फायद्याचा सौदा, तर रिषभ पंत…

हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग, यांच्यातला ट्रेड हा सर्वात चर्चेचा विषय ठरला. मुंबई इंडियन्सने त्यांच्या कर्णधाराला पंजाब किंग्सकडे जाऊ देताना ट्वेंटी-२०तील यशस्वी वेगवान गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले.

 

इंडियन प्रीमिअर लीग २०२७ साठी १६ डिसेंबरला गोव्यात मिनी ऑक्शन होणार आहे आणि त्यापूर्वी रिटेन्शन म्हणजेच संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यासाठी बीसीसीआयने १७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठरवली आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत आणखी काही अदलाबदली पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

आतापर्यंत १० खेळाडूंनी संघ बदलले असून त्यात हार्दिक पांड्याने सर्वात फायद्याचा सौदा केला आहे, तर रिषभ पंतला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला आहे. रिषभने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडून पुन्हा दिल्ली कॅपिटल्सकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्याने यापूर्वी DC चे कर्णधारपदही भूषविले आहे आणि LSG ने त्याला २७ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले होते. पण, दिल्लीकडे परतताना रिषभने १२ कोटी कमी घेतले, म्हणजे तो केवळ १५ कोटींत दिल्लीच्या ताफ्यात परतला. दिल्ली आणि लखनौ यांच्यात आणखी एक सौदा झाला, तो म्हणजे कुलदीप यादवचा. कुलदीपला १३.२५ कोटींतच लखनौने आपल्या ताफ्यात घेतले, त्यामुळे फिरकीपटूचे ना नुकसान झाले ना फायदा…

 

आयपीएल २०२७ पूर्वी झालेल्या पहिल्या ट्रेडमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन आणि लेगस्पिनर झीशान अन्सारी यांचा समावेश होता. त्याने यापूर्वी SRH चे प्रतिनिधित्व करताना ५५ सामन्यांत ६५ विकेट्स घेतल्या होत्या, दिल्लीसाठी त्याला फार खेळता आले नाही, कारण दुखापतीमुळे तो बाहेरच होता. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात DCने नटराजनला १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो ५ कोटी रुपयांच्या सुधारित शुल्कावर SRH संघात सामील झाला. तेच अन्सारी त्याच्या मुळ ४० लाखांत दिल्लीत आला.

 

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) खलील अहमद आणि नॅथन एलिस यांना SRH कडे लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स यांच्या बदल्यात पाठवले. १३ कोटींचा लिव्हिंगस्टोन ६ कोटींत CSK कडे गेला, तर एडवर्ड्सची ३ कोटी रक्कम कायम राहिली. खलिल आणि एलिससाठी हैदराबादने अनुक्रमे ४.८ कोटी व २ कोटी मोजले.

 

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्या हस्तांतरणाची बातमी सर्वात मोठी ठरली. २०२४ पासून MI चा कर्णधार असलेला हार्दिक, त्याच्या आधीच्या १६.३५ कोटी रुपयांच्या शुल्काऐवजी १८ कोटी रुपयांच्या शुल्कावर PBKS मध्ये सामील झाला आहे. अर्शदीप त्याच्या १८ कोटींच्या शुल्कावरच मुंबईकडे गेला. हार्दिकडा १.६५ कोटींचा फायदा झाला…

 

Salary Changes After The IPL 2027 Trades

 

रिषभ पंत – २७ कोटींवरून १५ कोटी ( १२ कोटींचे नुकसान)

 

कुलदीप यादव – १३.५० कोटी – १३.५० कोटी ( काही बदल नाही)

 

हार्दिक पांड्या – १६.३५ कोटींवरून १८ कोटी ( १.६५ कोटींचा फायदा)

 

अर्शदीप सिंग – १८ कोटी- १८ कोटी ( काही बदल नाही)

 

लियाम लिव्हिंगस्टोन – १३ कोटींवरून ६ कोटी श्र ७ कोटींचे नुकसान)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -