Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रसंक्रांतीला पंढरपुरात विठ्ठल दर्शन सुरू, हार, प्रसाद नेण्यास बंदी

संक्रांतीला पंढरपुरात विठ्ठल दर्शन सुरू, हार, प्रसाद नेण्यास बंदी

वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटीनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मकर संक्रांत सणानिमित्त सुरू राहणार आहे. मात्र, मंदिर व परिसरात वाणवसा देण्यास व घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.तसेच भाविकांना मंदिरात मुख दर्शनाकरिता जाताना हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आल्याचे देवास्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सांगितले.

ते म्हणाले, मकरसक्रांत सणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी व रुक्मिणी मातेला वाणवसा देण्यासाठी हजारो महिला मंदिरात येतात. ही परंपरा आहे. या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बुधवार (दि. 12) रोजी बैठक पार पडली. या बैठकीस स्थानिक सदस्य प्रत्यक्ष तर बाहेरील सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -