Monday, December 23, 2024
Homeसांगलीखंडणीसाठी अपहरण झालेल्या बालकाची सुटका

खंडणीसाठी अपहरण झालेल्या बालकाची सुटका

माडग्याळ (ता. जत) येथील पृथ्वीराज सुरेश बिरादार (वय 8) याचे पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. वळसंग (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून कुंडल (ता.पलूस) येथून नितीन धोंडाप्पा शेडशाळ (रा. तिकोटा), लक्ष्मण किसन चव्हाण, केदार बाबासाहेब निपुजे यांना मुलासह ताब्यात घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल केला. ही घटना दि. 30 डिसेंबर 2021 रोजी घडली होती.

पृथ्वीराज सुरेश बिरादार हा मूळचा बेळगिली (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील आहे. त्याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यामुळे तो त्याच्या आजोळी माडग्याळ (ता. जत) येथे राहतो. पृथ्वीराज याच्या आईने (गौरव्वाने) त्याला तिची बहीण सरुबाई येरगल (रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी ठेवले होते.

दि.30 डिसेंबररोजी धोत्री येथे सकाळी साडेसहाच्या सुमारास पृथ्वीराज शाळेत जात होता. त्यावेळी “तुला तुझ्या आईकडे माडग्याळ गावी सोडतो”, असे सांगून पाच लाख रुपये खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते.

संशयित शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर) याने पृथ्वीराज याची आई गौरव्वा हिला फोन करुन दोन तीन वेेेळा संंपर्क केल्यामुळे पोलिसांना शंका आली. नितीन याला पोलिसांनी गोड बोलून पोलिस ठाण्यामध्ये बोलवून घेतले. प्रथम त्यानेे उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अपहरणाची संपूर्ण हकिकत पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून कुंडल (ता. पलूस) येथून नितीन धोंडाप्पा शेडशाळ (रा. तिकोटा), लक्ष्मण किसन चव्हाण, केदार बाबासाहेब निपुजे यांना मुलासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -