ताजी बातमी ऑनलाइन टीम
उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून शीतलहर सुरू आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. परिणामी राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे राज्यातील कमालबरोबरच किमान तापमानात चांगलीच घट आली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत थंडीचा कडाका आहे. दरम्यान, हवामान कोरडे राहिल्यामुळे थंडीचा कडाका आणि लाट पुढील आठवडाभर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (Cold Wave)
दरम्यान, गुरुवारी महाबळेश्वर शहराचे किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले आहे. हे तापमान राज्यात नीचांकी आहे. उत्तर भारतात हरियाणा राज्याच्या आसपासच्या भागावर पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढला आहे. हा प्रभाव पुढील चार ते पाच दिवस राहणार आहे. सध्या उत्तर भारतात शीतलहर आणि दाट धुके पसरले आहे.
त्यात 16 जानेवारीला हिमालयाच्या पायथ्याशी आणखी एक पश्चिमी चक्रावात सक्रिय होणार आहे. यामुळे या भागात थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे. राज्यात हवामान कोरडे राहून कडाक्याची थंडी पडली आहे. रात्रीबरोबरच दिवसादेखील थंडी चांगलीच जाणवत आहे.उत्तर कर्नाटक ते उत्तर ओडिशादरम्यान 1 किमी उंचीवरील कमी दाब क्षेत्र पट्ट्यामुळे तसेच याच परिसरात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वाहणार्या वार्याच्या टकरीमुळे मराठवाड्यात व विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे.
आगामी आठवडा थंडीची लाट कायम राहणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -