सांगली जिल्ह्यात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे शासकीय कोरोना (सिव्हील) रुग्णालयामध्ये आरोग्यदूत यांची संख्या कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिरजेतील शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. अनेक गरजू रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा आधार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि शासनाचे हे कोरोना रुग्णालय आहे. गेल्या दोन वर्षांत दहा हजारहून अधिक रुग्ण येथे बरे करण्यात आले आहेत. अगदी काही डॉक्टर आणि काही आरोग्यदूत पॉझिटिव्ह आल्या तरीही त्या बर्या होऊन पुन्हा कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येऊ लागली आहे.
जिल्ह्यात दररोज सुमारे तीनशे ते साडेतीनशे इतके जण कोरोना बाधित होत आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. कोरोनातून बरे होण्याचेही प्रमाण अधिक आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे बाराशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मिरजेतील शासकीय रूग्णालय व सिनर्जी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांवर उपचार केल जात आहेत.(