ताजी बातमी ऑनलाइन टीम
सावकारी करणाऱ्या वाळवा गावातील डॉक्टर दाम्पत्य डॉ. अनिल चंद्रकांत खुंटाळे व त्यांची पत्नी डॉ. रुक्मीणी अनिल खुंटाळे यांचेवर आष्टा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही तात्काळ अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, वाळवा गावात राहणारे संजय बंडा नायकवडी यांच्या आर्थिक परिस्थीतीचा फायदा घेवुन डॉ. रुपाली खुंटाळे व त्यांचे पती डॉ. अनिल खुंटाळे यांनी त्याची
दिशाभुल, फसवणुक करुन मौजे वाळवा येथील रि.स.नं ५१७/ १व याचे क्षेत्र हे १-१७ आर याचा आकार रु८-०७ पैसे यापैकी क्षेत्र हे ०-२० आर या मिळकतीचे ७ महिनेची मुदत खरेदीपत्र व मासिक ३% व्याजाने देणेचे ठरले असताना सुध्दा सदर मिळकतीचा साठेखत करार तयार करुन त्या व्यवहारापोटी व्याज व मुद्दलापेक्षा ४ लाख ५० हजार रु. जास्त घेवून पुन्हा सदरचे साठे करार दस्त उलटुन देणेकरीता आरोपी डॉ. रुपाली खुंटाळे व त्यांचे पती डॉ. अनिल खुंटाळे यांनी मासिक ५% व्याजाने आणखी साडे तीन लाख रु. ची मागणी केली.
व नाही दिल्यास तुझ्यावर केस टाकु व तुझ्या कुटूंबाला रस्त्यावर आणु अशी धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार हे करीत आहेत.
सावकारी करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -