जिल्हा बँक पदाधिकारी निवडीत अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोडीत आमदार राजूबाबा जयवंतराव आवळे यांना उपाध्यक्षपदी संधी मिळाली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी धक्कातंत्राचा वापर करीत हातकणंगलेला संधी देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद तर दिलीच, पण दुसर्या बाजूला जनसुराज्यचे नेते आमदार विनय कोरे यांच्यासह प्रकाश आवाडे यांनाही जाता-जाता धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, पेठवडगाव पालिकांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्र्यांनी ही चाल खेळल्याचे सध्या तरी दिसते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल करून ताकद आजमावली, तर कोरे, आवाडे, निवेदिता माने यांना सोबत घेऊन हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी मोट बांधली. आघाडीत सहभागी होत असताना कोरे यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण पॅनेलची रचना कोरे म्हणतील तशीच झाली. त्यामुळे जनसुराज्यला चार जागांवर उमेदवारी मिळाली.
या रचनेत कोरे यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची बांधणी समोर ठेवून जिल्हा परिषद सदस्य डॉ. अशोक माने यांना उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, आवळे यांच्या प्रेमापोटी पालकमंत्र्यांनी वेळीच सावध पवित्रा घेतला आणि ही अनुसूचित जाती गटातील जागा काँग्रेसकडे ठेवली. दुखावलेल्या कोरे यांना नाईलाजास्तव इतर मागासवर्गीय गटावर समाधान मानावे लागले.निवडणुकीपासून ते पदाधिकारी निवडीपर्यंत या मुद्द्यावरून कोरे नाराज होते. एकत्रित निवडणूक लढवली असताना प्रक्रिया गटातून जनसुराज्यचे प्रदीप भुयेकर यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला.
उपाध्यक्षपदी आमदार आवळे यांचे नाव पुढे आल्यानंतर कोरे यांच्या नाराजीत अधिकच भर पडली. उघड नाराजी व्यक्त करीत त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. कोरे यांच्या मध्यस्थीने विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीत कोरे यांच्या शब्दाला वजन आले. मात्र, जिल्हा बँक पदाधिकारी निवडीत त्यांना धक्का तर दिलाच, पण मनधरणीचाही कोणी प्रयत्न केला नाही. हे विशेष.
वडगाव बाजार समिती आणि भाजपची जवळीक
आमदार विनय कोरे आणि प्रकाश आवाडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. भविष्यात भाजप हाच काँग्रेसचा शत्रू आहे. त्यामुळे कोरे-आवाडे आघाडीसोबत किती काळ राहतील हे सांगणे अवघड आहे. तर वडगाव बाजार समितीत काँग्रेस- राष्ट्रवादीला वगळून कोरे-आवाडे यांनी मोट बांधली. त्याविरोधात राजूबाबा आवळे यांनी एकाकी झुंज दिली. त्यामुळे भविष्यातील राजकारणात आवळे यांनाच बळ देण्यासाठी त्यांना संधी दिली असावी, असे दिसते.
जिल्हा बँक : आवळेंना ताकद; आवाडे, कोरेंना धक्का!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -