ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशामध्ये सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा भीती वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटने सरकारच्या चिंतेत आणखी वाढ केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून वारंवार उपाययोजना आखल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून कोरोनासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली जात आहेत. नुकताच केंद्र सरकारने मास्कसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. केंद्र सरकारने या मार्गदर्शक तत्वांमध्ये असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गाची तीव्रता असूनही 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. जर स्टिरॉइड्सचा वापर केला जात असेल तर त्यांना सुधारणेच्या आधारावर 10 ते 14 दिवसांमध्ये डोस कमी केला पाहिजे
आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) मास्कसंदर्भात जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘मुले आणि किशोरवयीन वयोगटासाठी कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सुधारित व्यापक मार्गदर्शक तत्त्वे’मध्ये असेही म्हटले आहे की, पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस करण्यात आलेली नाही. पण यामध्ये हे देखील सांगितले आहे की, ‘आई-वडिलांच्या देखरेखीत 6 ते 11 वयोगटातील मुले सरिक्षित आणि योग्य पद्धतीने मास्कचा वापर करू शकतात
आरोग्य मंत्रालयाने पुढे असे सांगितले आहे की, ’12 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील सर्वांनी मास्क वापरला पाहिजे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या गटाने मार्गदर्शक तत्त्वांचे सुधारणा केलेली आहे.’ मंत्रालयाने सांगितले की, ‘इतर देशांतील उपलब्ध डेटावरून असे दिसून येते की ओमायक्रॉनमुळे होणारा आजार कमी गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळजी घणे गरजेचे आहे.’