ताजी बातमी ऑनलाइन टीम
भारतामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी आहे. डेटा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये डिसेंबर 2021 पर्यंत बेरोजगारांची संख्या तब्बल 5.3 कोटी इतकी होती.
5.3 कोटी बेरोजगारांपैकी 3. 5 कोटी लोक असे आहेत जे कायमस्वरूपी रोजगाराच्या शोधात आहेत. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठी असून, सध्या 80 लाख महिला कामाच्या शोधात आहे.
तसेच यातील 1.7 कोटी लोक असे आहेत जे लोक बेरोजगार आहेत, मात्र सध्या ते रोजगाराच्या शोधात नाहीत. यामध्ये महिलांची संख्या 90 लाख इतकी आहे.
जागितक बँकेच्या अहवालानुसार कोविडच्या काळात जागासह भारतामध्ये बेरोजगारीच्या प्रामाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू पुन्हा एकदा रोजगार वाढत आहे.
रोजगारच्या जागतिक मानकापर्यंत पोहोचायचे असेल तर भारताला आणखी 187.5 दशलक्ष रोजगार वाढवण्याची आवश्यकता आहे.