‘नीट-पीजी’ 2021 चे कौन्सिलिंग आणि ‘नीट-पीजी’ 2022 च्या परीक्षा यांच्या तारखा एकाचवेळी आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट-पीजी’ परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर टाकली आहे. ‘नीट-पीजी’ परीक्षा 12 मार्च रोजी पार पडणार होती, मात्र सरकारच्या निर्णयामुळे ही परिक्षा आता एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, (Web Series)
तारखांचा घोळ असल्याचे सांगत असंख्य विद्यार्थ्यांनी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी चालविली होती. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलली जात असल्याचे आरोग्य सेवा खात्याच्या सचिवांनी आदेशात म्हटले आहे.