ऊ अंतवा या गाण्यामुळे सामंथा रुथ प्रभू चांगलीचं चर्चेत आहे. नागा चैतन्य आणि सामंथा दोघेही २ ऑक्टोबर २०१ रोजी वेगळे झाले. दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. त्यांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली हाेती; पण, ऊ अंटावा या गाण्यानंतर चर्चा होतेय ती म्हणजे तिच्या टॅटूजची. हे टॅटू यासाठी खास आहेत की, तिचा एक्स पती नागा चैतन्यशी या टॅटूचं कनेक्शन आहे. हो. तुम्ही बरोबर वाचलात!
सामंथाने तिचे टॅटू फ्लॉन्ट केले होते. तिच्या मनगटावर एक टॅटू आहे, जो नागा चैतन्याच्या मनगटावरदेखील तसाच टॅटू पाहायला मिऴतो. तिच्या मनगटावर दोन बाण असणारा हा टॅटू आहे. हे रोमन चिन्ह आहे. त्याचा अर्थ होतो-‘आपली ओळख स्वत: बनवा.’




