साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान मोरे या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे उकळत्या चुन्यात ढकलून या मुलाला नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली आहे. उकळत्या चुन्यात ढकलून मुलाच्या अंगावर भाजलेल्या जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मारहाण करणारे संशयित हे दारू पिलेले असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे.
या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने साता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.