Friday, February 20, 2026
Homeमहाराष्ट्र20 वर्षांच्या विवाहितेचा जीव दुसऱ्या तरुणावर जडला,आईने काढला काटा; सतर्क रिक्षाचालकामुळे 'खेळखल्लास'

20 वर्षांच्या विवाहितेचा जीव दुसऱ्या तरुणावर जडला,आईने काढला काटा; सतर्क रिक्षाचालकामुळे ‘खेळखल्लास’

छत्रपती संभाजीनगर येथे 20 वर्षांच्या तरुणीची तिच्याच आईने हत्या केल्याची घटना घडली. नंदिनी (वय 20) असे मृत तरुणीचे नाव असून हत्येनंतर तिचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षेतून नेत असताना रिक्षाचालकाला संशय आला आणि ही घटना उघडकीस आली.

 

नंदिनीचे पहिले लग्न झाले होते. मात्र पतीसोबत भांडण झाल्याने ती माहेरी परतली होती. या दरम्यान तिचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध सुरू झाले. दुसरीकडे नंदिनीचा पती तिच्या आयुष्यात परतला आणि तिला सासरी नेण्यासाठी तयारही झाला. मात्र, नंदिनीने पतीसोबत जाण्यास नकार दिला. तर आईचे नंदिनीला म्हणणे होते की तू पतीसोबतच रहावं.

 

बुधवारी पोलीस ठाण्यात पोहोचला होता वाद

 

बुधवारी नंदिनी आणि तिची आई, सावत्र वडील यांच्यात कडाक्याचे भांडणही झाले होते. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. शेवटी पोलिसांनी दोन्ही बाजूंना समज देत माघारी पाठवलं.

 

गुरुवारी वादाने टोक गाठला

 

गुरुवारी रात्री नंदिनी आणि तिच्या आईमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. संतापाच्या भरात आईने नंदिनीचा गळा आवळून खून केला. मग सुरू झाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न.

 

आईने नंदिनीच्या मामाला आणि सावत्र वडिलांना सोबत घेतले. सावत्र वडील रिक्षेतून मृतदेह नेतील आणि विल्हेवाट लावतील असं ठरलं होतं. सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होते. मृतदेह गादीत गुंडाळला, रिक्षाचालकाला संशय येऊ नये यासाठी रिक्षेत घरातील इतर सामानही ठेवण्यात आले. पण शेवटी रिक्षाचालकाने हेरलंच आणि त्याने संशय बळावल्यावर पोलिसांना घटनेची माहिती.

 

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. नंदिनीची आई, मामाला ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी ‘पुढारी न्यूज’ला सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -