Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगसरकारच्या या निर्णयामुळे आता 'येथे' दारू स्वस्त

सरकारच्या या निर्णयामुळे आता ‘येथे’ दारू स्वस्त

विमानाने प्रवास करणाऱ्या आणि दारूचे शौकीन असणाऱ्या तळीरामांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच राज्याअंतर्गत प्रवास करतानादेखील दिल्ली विमानतळावर कमी किमतीत दारू विकत मिळणार आहे.

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने काही अनअधिकृत दारु भागाचे रूपांतर आता अधिकृत भागात केले आहे. यासाठी रिटेल परवाना असलेल्या लोकांना या भागात दारूविक्रीसाठी परवानगी दिली आहे. या निर्णयाने १३४ दारूच्या दुकानांना फायदा होण्याची शक्यता आहे.

दिल्ली सरकारच्या नव्या धोरणानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. आयजीआय विमानतळावर दुकाने नवे पर्याय म्हणून उघडले जाणार आहेत. मार्च पहिल्या आठवड्यापासून ही दुकाने उघडता येणार आहेत. दिल्ली सरकारच्या धोरणानुसार राज्यांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय टर्मिनल्सवर १० दुकाने उघडली जाणार आहेत. ६ दुकाने ही १,२ आणि ३ क्रमांकाच्या टर्मिनल्सवर उघडली जातील. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दुकानांमध्ये दारूच्या विक्रिला सुरूवात होईल. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -