ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संजू बाबा पत्नी मान्यताला फूट मसाज देताना दिसत आहे. सोशल मीडियावर पती-पत्नीचा हा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. Manyata Dutt यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. संजय दत्तच्या चाहत्यांकडून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. काहींनी तर ‘लगे रहो मुन्ना भाई’ म्हटले आहे.
मान्यता दत्त यांनी हा व्हिडिओ शेअर करत, ‘माझे सर्व आनंदी क्षण तुमच्या सोबत घालवले आहेत. हॅप्पी ॲनिव्हर्सरी’ संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे लग्न २००८ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. एका चाहत्याने लिहिलय की, बाबा खूपच कोमल हद्ययाचा माणूस आहे. तर एका चाहत्याने त्याला लिजेंड म्हटले आहे. एका चाहत्याने मजेदार कमेंट लिहिली आहे, ज्यात एखादा सामान्य व्यक्ती असो, किंवा संजय दत्त असो, बायकोचे पाय दाबावे लागतातचं.
संजय दत्तच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास त्याच्या आगामी सिनेमांमध्ये तुलसीदास ज्यूनियर, शमशेरा आणि बहुप्रतीक्षित ‘केजीएफ चॅप्टर २’ चा समावेश आहे. संजय दत्तचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशारीतीने संजय दत्त त्याच्या आगामी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
लग्नाच्या वाढदिनी संजू बाबाकडून पत्नी मान्यताला फूट मसाज; Video व्हायरल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -