सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या आठवड्यात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे आणि प्रॉमिस डे साजरे करण्यात आले आहेत. यानंतर आज हग डे साजर केला जाणार आहे.
एखाद्याला मिठी मारल्याने विश्वासही निर्माण होतो. कोणाला धीर द्यायचा असेल तर त्याला मिठी मारली जाते. काळजी व्यक्त करण्यासाठी देखील मिठी मारणे हा उत्तम पर्याय आहे. एखाद्याला प्रेमाने मिठी मारल्याने एकमेकांशी नातं घट्ट होते. तुमचा आनंद द्विगुणीत होतो. मिठी मारल्याने तणाव आणि चिंता देखील काही प्रमाणात दूर होते. वैज्ञानिकांचे अभ्यास देखील मिठी मारण्याचे अनेक फायदे सांगतात. मिठी कॉर्टिसोल आणि तणाव हार्मोनची पातळी कमी होते. तसेच यामुळे वेदना कमी होतात आणि स्नायूंना आराम मिळतो.
वैज्ञानिकांच्या मते मिठी मारल्याने कॉर्टिसोलची पातळी कमी होते. मिठी मारल्याने रात्री चांगली झोप येण्यासही मदत होते.
मिठी मारल्याने मेंदूतील ऑक्सीटोसिन किंवा फील-गुड रसायनाची पातळी वाढते जे आपल्याला आनंदी, सक्रिय आणि शांत बनवते.
मिठी मारल्याने समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधणे सोपे होते. समोरच्याच्या मनात आपल्या भावना पोहचवण्यास मदत होते. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मिठी मारल्याने मदत होते.
मिठी मारल्याने हे लक्षात येते की आपण सुरक्षित आहोत, कोणाला तरी प्रिय आहोत आणि एकटे नाही. मिठी मारल्याने सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
तुमच्या जवळचे कोणी चिंतेत किंवा दु:खी असेल तर मिठी मारल्याने त्याला दिलासा आणि हिम्मत मिळेल.
एखाद्याला मिठी मारल्याने त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि त्याचे विचार सकारात्मक होऊ शकतात.