आर्थिक वर्ष 2021-2022 संपायला अवघे काही
दिवस उरले आहेत. अशा स्थितीत 31 मार्चपर्यंत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे प्लॅनिंग करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळू शकेल. प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत देण्याची तरतूद आहे.
तुमच्या प्राप्तीकराच्या कलम 80 डी अंतर्गत तुम्हाला काही कर सवलत मिळू शकते. यामध्ये तुम्हाला आरोग्य विमा घेतल्यावर 1 लाखाची वेगळी कर सूटही मिळते. या कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कुटुंब आणि पालकांच्या आरोग्य विम्या ची मदत घेऊ शकता.
आई-वडिलांच्या आरोग्य विम्यावर मिळतो GRT CITY प्राप्तीकर नियमांनुसार, तुम्हाला 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीच्या आरोग्य विम्यावर 25 हजारांपर्यंत सूट मिळते. दुसरीकडे, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला सूट दिल्यास, तुम्हाला 50 हजारांपेक्षा जास्त कर सवलतीचा लाभ मिळतो. तुम्ही आई – वडील दोघांसाठी आरोग्य विमा योजना खरेदी केल्यास तुम्हाला 75 हजार रुपयांची सूट मिळेल.
दुसरीकडे, जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही स्वत:साठी आणि तुमच्या आई – वडिलांसाठी आरोग्य विमा खरेदी केला असेल, तर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. याच्या मदतीने तुम्हाला आरोग्य पॉलिसीचा लाभ मिळेल तसेच टॅक्स बेनिफिटचाही फायदा मिळेल.