Monday, December 23, 2024
Homeक्रीडावेस्ट इंडिजचा पराभव करून भारत बनला T20 चा 'किंग '

वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत बनला T20 चा ‘किंग ‘

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. यात भारताने 17 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. यासह भारत टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनला आहे. टीम इंडियाने 6 वर्षात पहिल्यांदाच हे स्थान मिळवले आहे. भारतीय संघाने T20 क्रमवारीत इंग्लंडवर मात केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेतील पहिला सामना 6 गडी राखून जिंकला होता, तर दुसरा सामना 8 धावांनी जिंकला होता. याआधी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिकाही 3-1अशी जिंकली होती.

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी स्वीकारताना टीम इंडियाने 5 विकेट गमावून 184 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करताना 31 चेंडूत 65 धावा केल्या. त्याच्याशिवाय व्यंकटेश अय्यरने नाबाद 35 धावा केल्या. दोघांमध्ये 41 चेंडूत 91 धावांची भागीदारी झाली. याशिवाय भारताकडून इशान किशनने 34 आणि श्रेयस अय्यरने 25 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने अवघ्या 7 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर, रोमारियो शेपर्ड, रोस्टन चेस, हेडन वॉल्श आणि डॉमिनिक ड्रेक्सने 1-1 बळी घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -