ताजी बातमी ऑनलाइन टीम
महापुरात अनेक जणांचे अडचणी असतात व त्यांचे काम आढळत असते त्यामुळे आता या मार्गामुळे सटका मिळणार आहे महापुराने वाहतूक ठप्प होणार्या कागल-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा पूल ते सांगली फाट्यासह तीन ठिकाणी रस्ता उचलून महापुराचे पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था केली जाणार आहे. त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.महामार्ग महापुरातून मुक्त करा या मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे सिद्धार्थ शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
दूधगंगा पुलाजवळ भुयारी मार्ग
दूधगंगा पुलाजवळ रस्त्याची उंची वाढवून तेथे भुयारी मार्ग केला जाणार आहे. रस्त्याची उंची वाढविताना महापुराचे पाणी प्रवाहित राहील अशी व्यवस्था केली जाणार आहे. असेच काम उचगाव रेल्वे पुलानजीक केले जाणार आहे. पंचगंगा पूल ते सांगली फाटा येथे तुंबणार्या पाण्याची प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवून ठिकठिकाणी भुयारी मार्ग व महापुराचे पाणी प्रवाहित राहील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचून वाहतूक बंद राहणार नाही
सांगली फाटा, उचगाव रेल्वे पुलाचा समावेश
कागल-सातारा महामार्गावर पंचगंगा पूल ते सांगली फाटा, दूधगंगा पूल, उचगाव रेल्वे पूल आदींसह ठिकठिकाणी महापुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद राहतो. पंचगंगा पूल ते सांगली फाटा येथे भिंत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते.
कोल्हापूर : महापुरातही हा महामार्ग राहणार खुला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -