भारतीय रेल्वेच्या केटरिंग आणि तिकीट बुकिंग युनिटने (IRCTC) आपल्या यूजर्संसाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. हे NPCI आणि BOB फायनान्शियल सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने लॉन्च करण्यात आले आहे. IRCTC वेबसाइटवर दररोज 60 दशलक्षाहून अधिक यूजर्स रेल्वे तिकीट बुक करतात. ट्रेनमध्ये सतत प्रवास करणाऱ्या अशा प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि लाभासाठी हे क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी हे क्रेडिट कार्ड लॉन्च करताना सांगितले की आयआरसीटीसी BoB रुपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डचा लाभ भारतीय रेल्वेमध्ये सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल. विशेषकडून अशा प्रवाशांसाठी हे कार्ड तयार करण्यात आले आहे. BOB Financial Solutions Limited ही बँक ऑफ बडोदाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
ग्राहक या क्रेडिट कार्डचा वापर करून इंधन आणि किराणा सामान तसेच इतर वस्तू खरेदी करू शकतात. कार्डधारक JCB नेटवर्कद्वारे इंटरनॅशनल मर्चंट्स आणि एटीएममध्ये व्यवहार करण्यासाठी या कार्डचा वापर करू शकतात. IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे क्रेडिट कार्डद्वारे 1AC, 2AC, 3AC, CC, किंवा EC बुक करणार्या वापरकर्त्यांना 40 रिवॉर्ड पॉइंट्स (per Rs 100 spent) मिळतील. हे क्रेडिट कार्ड ग्राहकांना त्यांच्या सर्व रेल्वे तिकीट बुकिंगवर 1% व्यवहार शुल्क माफ करते. याव्यतिरिक्त कार्ड जारी केल्याच्या 45 दिवसांच्या आत 1,000 रुपये किंवा त्याहून अधिकची एकच खरेदी करणाऱ्यांना 1,000 बोनस रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतील.
किराणा आणि डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये कार्ड वापरल्यास चार रिवॉर्ड पॉइंट्स (प्रति 100 रुपये खर्च) आणि इतर श्रेणींमध्ये दोन रिवॉर्ड पॉइंट्स देखील मिळतील. कार्डधारकांना दरवर्षी पार्टनर रेल्वे लाउंजमध्ये चार वेळा कॉम्प्लीमेन्ट्री व्हिजिट करू शकतील. या कार्डद्वारे ग्राहकांना भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर एक टक्के इंधन सरचार्जच माफ होईल.