Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रट्रक चालकाने ब्रेक लावले, मागून बस धडकली, बसच्या चाकाखाली येऊन बाईकस्वाराचा मृत्यू

ट्रक चालकाने ब्रेक लावले, मागून बस धडकली, बसच्या चाकाखाली येऊन बाईकस्वाराचा मृत्यू

ट्रक आणि बसच्या अपघातात  दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यात  हा धक्कादायक प्रकार घडला. ट्रक चालकाने रस्त्यावरुन जात असताना अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या बसने ट्रकला धडक दिली. त्या बरोबरच बसच्या मागून येणारा बाईकस्वार तरुण हा बसच्या चाकाखाली आला. त्यामुळे त्याला प्राण गमवावे लागले. तिरोडा शहराला लागून असलेल्या अदानी विद्युत प्रकल्पा समोर हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रकला बस मागून धडकल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात बसच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहराला लागून असलेल्या अदानी विद्युत प्रकल्पासमोर ट्रक आणि बसच्या धडकेत एका दुचाकी चालकाचा बस खाली येऊन मृत्यू झाला.

ट्रक चालकाने रस्त्यावरुन जात असताना अचानक ब्रेक लावले. त्यामुळे मागून येणाऱ्या बसने ट्रकला धडक दिली, मात्र बसच्या मागून येणारा तरुण हा बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातांची मालिका,प्रशासनाचं दुर्लक्ष
मयत बाईकस्वार हा तिरोडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या नवरगावातील रहिवासी होता. या आधी देखील अदानी विद्युत प्रकल्पासमोर अनेक वेळा मोठे अपघात घडले आहेत. मात्र तरी प्रशासनाला जाग आलेली दिसत नसल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -