Thursday, January 9, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : शिरदवाड येथे राज्य मार्गावर स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन

कोल्हापूर : शिरदवाड येथे राज्य मार्गावर स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन

शिरदवाड (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीसाठी दिवसा १० तास वीज मिळावी, थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी आणि इतर मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.

शेतकऱ्यांसाठी राज्यात अनेक ठिकाणी दिवसा वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीत शेतीला पाणी देताना साप चावणे, रानटी प्राण्यांचे हल्ले, श्वापदे यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपले जीव गमवावे लागत आहेत. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही मागणी असून देखील ती मिळत नाही; त्याचप्रमाणे शेतीचे थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्याचे सपाटाच लावला जात आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काही दिवसांपासून शेतीला दिवसा १० वीज मिळावे व वीज तोडणी तात्काळ थांबवावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

याचाच एक भाग म्हणून आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी घटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. यामुळे लाट, लाटवाडी, शिरदवाड व शिवनाकवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुमतीनाथ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी-शिरदवाड येथील महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मार्गावर चक्का जाम आंदोलन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -