Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगHSC Exam 2022 पहिल्या पेपरमध्ये बोर्डाकडून चूक, ‘त्या’ प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना...

HSC Exam 2022 पहिल्या पेपरमध्ये बोर्डाकडून चूक, ‘त्या’ प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार

बारावी बोर्ड परीक्षेला (HSC Exam) कालपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान काल बारावीच्या परीक्षेत इंग्रजी(English) विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळांकडून  देण्यात आली आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बारावी बोर्डाचे परीक्षा सुरु आहे. यामध्ये पहिल्याच झालेल्या इंग्रजीच्या BOS member व CM   संयुक्त सभेतील शिफारसीनुसार प्रश्न पत्रिकेतील प्रश्न 1 मधील A5 प्रश्नाला सूचना प्रिंट झाला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना फुल्लक्रेडिट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

युक्रेनमधून परतलेल्या MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी!

बारावीच्या बोर्ड परीक्षेला राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देत आहेत. कोरोनाच्या काळात दोन वर्ष परीक्षा न झाल्याने गुणवत्ता दर्जा घसरत असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. परीक्षा केंद्रांवरती कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 9 हजार 635 केंद्रावर होणार परीक्षा होणार असून 5 आणि 7 मार्चला होणार पेपर मात्र पुढे ढकलण्यात आला असून तो पेपर 5 आणि 7 एप्रिलला होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -