ताजी बातमी ऑनलाइन टीम
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मोजणी गुरुवारी सुरु असून उत्तर प्रदेशात भाजप आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटले. (stock market) आज बाजार खुला होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली आहे. सेन्सेकमध्ये ११०० अंकांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ३०० अंकांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्समधील ३० पैकी २९ शेअर मध्ये वाढ झाली आहे. तर टाटा स्टील हा एकमेव शेअरमध्ये घसरण झाली आहे.एसबीआय, रिलायन्स, अॅक्सिस बँक, एसबीआय, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअरमध्ये वाढ झाली आहे. निफ्टीच्या जवळपास सर्वच क्षेत्रीय (stock market)निर्देशांकात वाढ झाली आहे. ज्यात निफ्टी बँक, निफ्टी आॅटो, निफ्टी आयटी, निफ्टी मिडिया या क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली आहे.
सध्या सेन्सेक्स ९७७ अंकांनी वधारला असून तो ५५६२४ अंकावर आहे. निफ्टी २९८ अंकांनी वधारला असून तो १६६४३ अंकावर ट्रेड करत आहे. निफ्टीच्या जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली आहे. ज्यात निफ्टी बँक, निफ्टी आॅटो, निफ्टी आयटी, निफ्टी मिडिया या क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टीवर वोडाफोन, येस बँक , टाटा मोटर्स, बँक आॅफ बडोदा या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
महागाई वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती लवकरच नियंत्रणात येतील, असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे अमेरिकन शेअर निर्देशांकात बुधवारी तेजी दिसून आली. गुंतवणूकदार पुन्हा भांडवली बाजाराकडे वळाला असल्याने भारतात देखील तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक डाॅ. व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले.
मिश्र जागतिक संकेतांवर प्रमुख भारतीय निर्देशांक बुधवारी काहीसे वरच्या स्तरावर व्यवहार झाले. दिवसभरात निफ्टीने उच्चांकी स्तरावर व्यवहार केले आणि दुपारच्या सत्रानंतर त्याला अधिक गती मिळाली. बाजार बंद होताना प्रमुख निर्देशांक २.०७% ने वाढून १६,३४५.३५ वर बंद झाला. सेन्सेक्स १,२२३ अंकांनी वधारला आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही २.१६% आणि २.३८% ची वाढ झाली होती.लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरु आहे. देशातील सर्वात मोठ राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची सरशी होत असल्याचे प्राथमिक निकालांमधून दिसून आले आहे.