ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोणत्याही जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिस हे त्यांच्या खाकी वर्दीवरून सर्वसामान्य लोक ओळखतात. पोलिसांच्या खाकी वर्दीचा इतिहास ब्रिटिश काळाशी संबंधित आहे. भारतात इंग्रजांचे राज्य असतानाच पोलीस प्रशासनाची सुरूवात झाली. त्या काळात ब्रिटिश पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी साधे कपडे घालूनच काम करायचे. मात्र काही काळानंतर त्यांच्यासाठी पांढरा गणवेश निश्चित करण्यात आला.
भारतातील पोलिसांचा इतिहास खूप जुना आहे. तसेच पोलिसांचा गणवेश ही जुना आहे. गणवेश पोलिसांची ओळख पटते. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोक दुरूनच ओळखतात. पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी आहे.
पण अनेकांच्या मनात हा प्रश्न पडतो की पोलीस फक्त खाकी वर्दी का घालतात?
भारतातील पोलीस ब्रिटिश राजवटीत पांढरा गणवेश घालू लागले. पण या गणवेशाचीही(Police uniforms) एक अडचण निर्माण झाली. पोलिसांचा पांढरा गणवेश ड्युटीवर असताना लवकर घाण व्हायचा. ते दिसायला खूप वाईट दिसत असत. पांढऱ्या गणवेशावर छोटे छोटे डागही स्पष्ट दिसत होते. तसेच पांढरे कपडे धुण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची.
अस्वच्छता लपवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला गणवेश वेगवेगळ्या रंगात रंगवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांचा गणवेश अनेक रंगात दिसू लागला. हे पाहून इंग्रज अधिकारी संतप्त आणि अस्वस्थ झाले. 1847 मध्ये, ब्रिटीश अधिकारी सर हॅरी लुम्सडेन यांच्या सल्ल्यानुसार, पोलिसांचा गणवेश हलका पिवळा आणि तपकिरी रंगांनी रंगविला गेला. मग चहाची पाने, पाणी वापरण्यात आले आणि नंतर कॉटन फॅब्रिकचा रंग डाईसारखा बनवून युनिफॉर्मव पोलिसांचा गणवेश खाकी झाल्यामुळे त्यावर डाग, धुळीच्या खुणा कमी दिसू लागल्या. खाकी रंगाचा गणवेश पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवडला. यानंतर सर हॅरी लुम्सडेन यांनी अधिकृतपणे खाकी रंगाचा गणवेश स्वीकारला. त्यांच्या शिफारसीनुसार, 1847 मध्ये खाकी रंगाचा गणवेश भारतातील ब्रिटिश पोलिसांमध्ये स्वीकारण्यात आला. तेव्हापासून भारतातील पोलिसांच्या गणवेशाचा(Police uniforms) रंग खाकी आहे.
कोलकाता हे देशातील एकमेव शहर आहे जिथे अजूनही सर्व पोलीस पांढरा गणवेश परिधान करतात. याशिवाय अनेक राज्यांतील वाहतूक पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारीही पांढरा गणवेश परिधान करतात. मात्र देशातील सर्वच राज्यांमध्ये मुख्य पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी आहे.