ताजी बातमी ऑनलाइन टीम
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशीचं तेजी नोंदविली गेली. आज (शुक्रवारी) प्रमुख इंडेक्स (Sensex and nifty) सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद झाले. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत शेअर बाजारात (stock market) आज नोंदविली गेलेली तेजी कमी ठरली. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स 86 अंकांच्या वाढीसह 55,550.30 च्या टप्प्यावर आणि निफ्टी 35 अंकांच्या वाढीसह 16630 वर बंद झाला. आज शेअर बाजारात सर्वाधिक कामगिरी फार्मा सेक्टर मध्ये दिसून आली. ऑटो सेक्टर घसरणीसह बंद झाले. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्समध्ये 2700 अंकांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात आज ट्रेडिंगच्या सुरुवातीला घसरण नोंदविली गेली. त्यानंतर नीच्चांकी स्तरावर शेअर्सच्या खरेदीवर जोर दिसून आला.
कुणाला अप्पर, कुणाला लोअर?
आज बीएसई वर ट्रेडिंग होणाऱ्या 3458 शेअर्सपैकी 2076 शेअर तेजीसह बंद झाले. तर 1263 स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. तर 119 स्टॉकची कामगिरी स्थिर राहिली. आज 15 स्टॉक मध्ये अप्पर सर्किट आणि 4 स्टॉक मध्ये लोअर सर्किट दिसून आले. आजच्या तेजीसह बीएसई वर लिस्ट (सूचीबद्ध) सर्व कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य 253 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
रिलायन्सला संकटात संधी!
बुधवारी ट्रेडिंगदरन्यान सेन्सेक्सवर रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक 5.24 टक्क्यांच्या वाढीसह 2353.8 च्या स्तरावर बंद झाला. केवळ एकाच दिवसात कंपनीच्या स्टॉकमध्ये 117 रुपयांची वाढ नोंदविली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात स्टॉक 2236.70 च्या टप्प्यावर बंद झाला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक निफ्टीमध्ये सहभागी 50 स्टॉक मध्ये सर्वाधिक तेजी नोंदविणारा स्टॉक ठरला आहे. आजच्या वाढीसह बीएसई कंपनीचे बाजार मूल्य 15,92,304 कोटींवर पोहोचले आहे. मंगळवारी कंपनीचे बाजारमूल्य 15,13,087 रुपयांच्या स्तरावर होते.
आजचे शेअर बाजारचे अपडेट पॉईंट-टू-पॉईंट:
मोठ्या स्टॉक्ससोबत छोट्या स्टॉक्समध्ये तेजी
निफ्टी 50 मध्ये 0.21 तेजीसह मिड कॅप 50 आणि स्मॉलकॅप 50 मध्ये 0.7 टक्क्यांहून अधिक वाढ
स्मॉलकॅप 100 इंडेक्स मध्ये 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद
सेक्टर इंडेक्स मध्ये सर्वाधिक तेजी फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये दिसून आली.
हेल्थकेअर सेक्टर इंडेक्स 2.6 टक्के आणि फार्मा सेक्टर इंडेक्स 2.46 टक्क्यांच्या वाढीसह बंद
सरकारी बँकांत एक टक्क्यांची तेजी
ऑईल आणि गॅस सेक्टर इंडेक्स 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद
ऑटो, आयटी आणि मीडिया सेक्टरवर घसरणीची छाया.