ताजी बातमी ऑनलाईन टीम
बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा – जालना रोडवरील बायपासवर आज सकाळी भीषण अपघात (Accident) झाला. मालवाहू ट्रक (Truck) आणि बोलेरो (Bolero) जिपमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी आहेत . मात्र हा अपघात कसा झाला ? याचे याचि देही याचि डोळा चित्रण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या सीसीटीव्ही (CCTV)मध्ये अपघाताची भीषणता स्पष्ट दिसत आहे.
अपघातात 5 ठार तर 7 जण जखमी
शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो जीप आणि जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झालीय. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी साडे पाचच्या सुमारास देऊळगाव राजा जालना बायपासजवळ हॉटेल विजयसमोर घडली. अपघातातील मयत आणि जखमी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रोहणवाडीचे रहिवाशी आहेत.

बोलेरो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
या अपघाताचे cctv फुटेज समोर आले आहे. बोलेरो चालक हा लेन सोडून भरधाव वेगाने गाडी दामटत होता. त्यातच त्याचे नियंत्रण सुटून तो ट्रकला समोरासमोर जाऊन धडकला. यामध्ये कार चालकासह चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश गरिबदास लिहणार असे बोलेरो चालकाचे नाव आहे. त्याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोलेरो गाडीतील कुटुंब शेगावला दर्शनासाठी चालले होते
या घटनेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, रोहणवाडीतील पाडमुख कुटुंब बोलेरोने नातेवाईकांसह शेगावला दर्शनासाठी जात होते. अर्जुन जयंतराव पाडमुख (60), त्यांची पत्नी कांताबाई (55), मुलगा श्रीमंत (45) यांच्यासह कुलदीप अर्जुन गायकवाड (32), बोलेरो चालक आकाश गरीबदास लिहणार (21) अशी अपघातात ठार झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर आम्रपाली विठ्ठल पाडमुख (35), मीनाबाई श्रीमंत पाडमुख (35), अशोक गरीबदास लिहणार (26), तुकाराम बाबुराव खांडेभराड (40), मीराबाई परमेश्वर बाळराज (40), बाबुराव श्रीपत कापसे (50), परमेश्वर कचरूबा बाळराज (39) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.