Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाInd Vs Sl : रोहित शर्माच्या कॅप्टनसीला तीव्र विरोध, प्रेक्षकांनी झळकवली निषेधाची...

Ind Vs Sl : रोहित शर्माच्या कॅप्टनसीला तीव्र विरोध, प्रेक्षकांनी झळकवली निषेधाची पोस्टर्स!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारत आणि श्रीलंका (Ind Vs Sl) यांच्यात बंगळूर स्टेडियमवर गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला गेला. हा सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंकेला व्हॉईट वॉश दिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा ही पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना होता. विराट कोहलीसाठी बंगळूर हे जवळपास होम ग्राउंड आहे, त्यामुळे त्याला येथे जबरदस्त पाठिंबा मिळला. दरम्यान, रविवारी दोन मुले एक पोस्टर घेऊन बंगळूर स्टेडियमवर पोहोचली होती, ज्यावर लिहिले होते की, रोहित शर्मा माझा कर्णधार नाही (Rohit Not My Captain), विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवा. हा फोटो मुलांच्या वडिलांनी ट्विट केला होता, जो खूप वेगाने व्हायरल झाला होता.



पण यानंतर सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली, ज्यावर लोकांनी लिहिले की, रोहित शर्मा(Ind Vs Sl) देशाचा कर्णधार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल असे बोलणे योग्य नाही. त्याच वेळी, काही लोकांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या घोषणाबाजीवर आक्षेप घेतला आणि क्लब क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्यास सांगितले.



या फोटोची अनेकांनी खिल्लीही उडवली आणि लिहिले की, रोहित (Ind Vs Sl) तुझा कर्णधार नाही कारण तू संघात नाहीस. तर काही यूजर्सनी रोहित हा देशाचा कर्णधार आहे, त्यामुळे तो तुमच्या मुलांचा कर्णधार नाही असे उत्तर दिले.

विशेष म्हणजे बंगळुरू हे विराट कोहलीचे दुसरे होम ग्राउंड आहे. कारण आयपीएलमध्ये तो सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी जोडला गेला आहे आणि बराच काळ कर्णधार होता. तीन दिवसांच्या खेळातच असे अनेक प्रसंग आले, जेव्हा प्रेक्षक विराट कोहली, आरसीबीच्या नावाने घोषणा देताना दिसले.

बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काही प्रेक्षक सुरक्षेचा घेराव तोडून मैदानात घुसले आणि विराट कोहलीसोबत सेल्फीही काढला. विराटने चाहत्यांसोबत फोटो काढला आणि नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना चाहत्यांवर कोणतीही कारवाई करू नका असे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -