Monday, December 23, 2024
Homeआरोग्यकॉर्बेवॅक्स लस १२ ते १४ वयोगटातील मुलांना द्या; मोदी सरकारचे राज्य, केंद्रशासित...

कॉर्बेवॅक्स लस १२ ते १४ वयोगटातील मुलांना द्या; मोदी सरकारचे राज्य, केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

केंद्र सरकारने देशातील १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. उद्या, बुधवारपासून या मुलांचे लसीकरण सुरू केले जाईल. परंतु, या वयोगटातील मुलांना केवळ ‘कॉर्बेवॅक्स’ लस लावावी, असे निर्देश मंगळवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुले तसेच १८ वर्षांहून अधिक वय असलेल्यांसाठी यापूर्वीच लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील बालकांना कॉर्बेवॅक्स लस (Vaccine) लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. १४ ते १५ वयोगटातील मुलांना १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणात यापूर्वीच समाविष्ठ करण्यात आले आहे. या मुलांना भारत बायोटेकने विकसित केलेली पूर्णत: स्वदेशी लस ‘कोव्हॅक्सिन’ दिली जात आहे.

६० वर्षांहून अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना खबरदारी म्हणून बूस्टर डोस लावले जातील, असे देखील आरोग्य सचिवांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. दुसरा डोस घेवून नऊ महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे, अशांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. बूस्टर डोस देखील पूर्वी लावण्यात आलेल्या लसीचाच देण्यात येईल, अशा सूचना भूषण यांनी दिल्या आहेत. कॉर्बेवॅक्स लस बॉयोलॉजिकल-ई ने विकसित केली आहे. नुकतीच औषधी महानियंत्रकांनी या लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने कंपनीकडून पाच कोटी लस खरेदी केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -