Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगIndia Corona Cases: चीन, यूरोपनंतर आता भारतातही धोक्याची घंटा?

India Corona Cases: चीन, यूरोपनंतर आता भारतातही धोक्याची घंटा?

भारतासाठी (India) एक धोक्याची घंटा आहे. भारतामधे
पुन्हा एकदा कोरोना (Covid 19) पाय पसरवताना दिसतो आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण भारतामध्ये एकाच दिवशी 1,549 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या केस कमी झाल्या होत्या. मात्र, आता परत एकदा देशामध्ये कोरोनाच्या केस झपाट्याने वाढताना दिसत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) सोमवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मृत्यूची संख्या आतापर्यंत 5,16,510 वर पोहोचली असून दररोज 31 मृत्यू झाले आहेत. मंत्रालयाने सकाळी 8 वाजता यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

एकूण संक्रमणांपैकी 0.06 टक्के सक्रिय केस आहेत, तर कोरोना बरे होण्याचा दर 98.74 टक्के नोंदवला गेला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दररोजचा पाॅझिटिव्ह दर 0.40 टक्के आणि आठवड्याचा 0.40 टक्के नोंदविला गेला आहे. गेल्या 24 तासात एकूण 3,84,499 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. विशेष म्हणजे आणि अत्यंत सकारात्मक बाब म्हणजे कोरोनातून आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या 4,24,67,774 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के नोंदवले गेले आहे.
संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोनाचे लसीकरण अत्यंत जोमात सुरू आहे.

भारतातील कोरोना रूग्णांची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांवर गेली होती. 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख, 20 नोव्हेंबर रोजी 90 लाख आणि 19 डिसेंबर रोजी एक कोटींचा होती. भारताने गेल्या 4 मे रोजी 2 कोटी आणि 23 जून रोजी 3 कोटींचा कोरोनाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, धार्मिक कार्यक्रम यांना देखील आता परवानगी देण्यात आली आहे. मात्र, झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या यामुळे धोका निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -