Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानब्रेकिंग : 6,000mAh बॅटरीसोबत लाँच झाला स्वस्त स्मार्टफोन Redmi 10

ब्रेकिंग : 6,000mAh बॅटरीसोबत लाँच झाला स्वस्त स्मार्टफोन Redmi 10

तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारी असाल आणि तुम्हचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण की तुम्हच्या बजेटला परवडणारा (Redmi 10 Price in India) Redmi 10 स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारात (Indian Market) लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच नायजेरियामध्ये लाँच करण्यात आला होता. Redmi 10C चे हे नवीन वर्जन आहे.

कमी बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना (Redmi 10 Price in India) फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. याशिवाय पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट प्रतिरोधक टेक्सचर बॅक पॅनल आहे जे फोनवर फिंगरप्रिंट्स दिसू देत नाही. आज आपण Redmi 10 या स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत…

Redmi 10: किंमत आणि उपलब्धता-
Redmi 10 स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. तर 6GB + 128GB मॉडेलची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन 24 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, Mi Home स्टोअर्स आणि रिटेल स्टोअर्सवरून खरेदी केला जाऊ शकतो.

Redmi 10: लाँच ऑफर –
Redmi 10 सोबत कंपनीने लाँच ऑफर देखील जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत यूजर्सना या स्मार्टफोनवर 1,000 रुपयांची झटपट सूट मिळू शकते. पण ही सवलत फक्त HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरच मिळेल.

Redmi 10: तपशील आणि वैशिष्ट्ये –
Redmi 10 हा कंपनीचा परवडणारा स्मार्टफोन आहे आणि तो EVOL डिझाइनसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यात 20.6:9 आस्पेक्ट रेशोसह 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनची स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 सह कोटेड आहे आणि हा ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे.

ग्राफिक्ससाठी यामध्ये यूजर्सना Adreno 610 GPU मिळेल. स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य सेन्सर 50MPचा आहे, तर 2MPचा डेप्थ सेन्सर आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 OS वर आधारित आहे आणि पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -