कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील प्राजक्ता रोहित जंगटे (वय २४) या नवविवाहिताने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी नवविवाहितेचा पती, दीर, सासू व सासरा यांच्याविरोधात कागल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणी मयत नवविवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, नवरा रोहित महावीर जंगटे, दीर अभिमन्यू महावीर जंगटे, सासू सुरेखा महावीर जंगटे आणि सासरा महावीर देवाप्पा जंगटे राहणार पिंपळगाव खुर्द यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत प्राजक्ता हिला वारंवार शारीरिक मानसिक त्रास देऊन तिला अपमानित करून विष पिण्यास व मरणास प्रवृत्त केले. हा प्रकार मागच्या दोन वर्षांपासून म्हणजे २२ फेब्रुवारी २०२० रोजी पासून ते दिनांक २१ मार्च २०२२ रोजी पर्यंत करत असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. राहत्या घरी पिंपळगाव खुर्द येथे तिच्यावर छळ होत असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले.